भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिव तो निवृत्ति विष्णु ज्ञानदेव पाही

shiv to nivrutti vishnu dnyanadev pahi

शिव तो निवृत्ति विष्णु ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई ॥१॥ धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया । धन्य ज्ञानदेव सोपान सखया ।।२।। प्रत्यक्ष पैठणीं भटां दाविली प्रचिती । रेडियाचे मुखें वदविली वेदश्रुती ||३|| चौदाशे वरुषचे तप्ती तीर रहिवाशी । गर्व हरविला चालविले भिंतीशी ।।४।। धन्य कान्हुपात्रा आजी झाली भाग्याची । भेटी झाली ज्ञानदेवाची ह्मणुनिया ।। ५ ।।