भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलंकापुरी पुण्यठाव

alankapuri punyathav

आलंकापुरी पुण्यठाव । तेथ समाधी ज्ञानदेव ।।१।। पांडुरंगें दीधला वर । भेटी निर्धार कृष्णपक्षीं ।।२।। नित्य स्नानालागीं जाणा । भागीरथी दिधली ज्ञाना ।।३।। सरस्वती मणिकर्णिका । त्रिसंगमीं वाहती देखा ।।४।। येथें स्नान करितां । वास वैकुंठीं तत्त्वतां ।। ५ ।। ऐसे देव सांगता । कान्होपात्रा आनंदता ।।६।।