भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिव शिव नाम वदतां वाचे । नासे पातक बहुतां जन्माचें

shiv shiv nam vadatan vache | nase patak bahutan janmachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिव शिव नाम वदतां वाचे । नासे पातक बहुतां जन्माचें ॥१॥ जो मुकुटमणी निका वैष्णव । तयाचें नाम घेतां हरे काळांचें भेव ॥२॥ तिहीं लोकीं श्रेष्ठ न कळे आगमां निगमां । तयाची गोडी ठाऊक श्रीरामा ॥३॥ एका जनार्दनीं नका दुजा भावो । विष्णु तोची शिव ऐसा निर्वाहो ॥४॥