भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिव शिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदिन

shiv shiv aksharen don | jo jape ratrandin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिव शिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदिन ॥१॥ धन्य तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ॥२॥ सदोदित वाचे । जपे शिव शिव साचें ॥३॥ एका जनार्दनीं शिव । सोपा मंत्र तो राणीव ॥४॥