भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिव भोळा चक्रवती । त्याचे पाय माझे चित्तीं

shiv bhola chakravati | tyache pay majhe chittin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिव भोळा चक्रवती । त्याचे पाय माझे चित्तीं ॥१॥ वाचे वदतां शिवनाम । तया न बाधी क्रोधकाम ॥२॥ धर्म अर्थ काम मोक्ष । शिवा देखतां प्रत्यक्ष ॥३॥ एका जनार्दनीं शिव । निवारी कलिकाळाचा भेव ॥४॥