भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिंगे काहाळा मोहरीं पावे

shinge kahala moharin pave

रचनाकार: संत निळोबा · अभंग
शिंगे काहाळा मोहरीं पावे । नादें हेलावे अंबर ॥१॥ वाकी घागर्‍या तोडर पायीं । धावती गाई थाट पुढें ॥२॥ मोर कुंचे चांदिवे वरि । नाचती गजरीं हरिनामें ॥३॥ पढती ब्रीद्रें सवें निळा । बहुत गोपाळा आवडे ॥४॥