भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकलासे टाणटोणा । तेणें ब्रह्माज्ञाना तुच्छ मानी

shikalase tanatona | tenen brahmadnyana tuchchha mani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिकलासे टाणटोणा । तेणें ब्रह्माज्ञाना तुच्छ मानी ॥१॥ बोले बहु चावट वचन । वेदां म्हणे तो अप्रमाण ॥२॥ सिद्धान्त धातांतांसी म्हणे । हें तो पाषांडी बोलणें ॥३॥ ऐसा पामर दुराचारी । वाचे न वदे कधीं हरी ॥४॥ एका जनार्दनीं मन । ज्याचें पाषाणचि जाण ॥५॥