भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरणागत आहे वैभवाचा धनी। सत्य भावें मानी अर्पिले तें

sharanagat ahe vaibhavacha dhani| satya bhaven mani arpile ten

रचनाकार: संत सेना · अभंग
शरणागत आहे वैभवाचा धनी। सत्य भावें मानी अर्पिले तें ॥१ ॥ आपणा वेगळें नेदी उरो कांहीं। भावेंचि दावी आपणामाजी ॥२॥ दशा आपली अंगा नेणें जाणे कांहीं । आपणाचि होय इच्छा त्याची ॥३॥ धाकुट्यासी माता करी स्तनपान। सेना म्हणे जिणें बरें हेंचि ॥४॥