भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरण जाऊं कोणासी । तुजविण ऋषीकेशी

sharan jaun konasi | tujavin rushikeshi

रचनाकार: संत सेना · अभंग
शरण जाऊं कोणासी । तुजविण ऋषीकेशी ॥१॥ पाहतां नाहीं त्रिभुवनी। दुजा तुज ऐसा कोणी ॥२॥ पाहिला शोधुनी । वेदशास्त्र पुराणीं ॥३॥ सेना म्हणे पंढरीराया। शरण सांभाळी सखया ॥४॥