भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरण आलों तुझियां पायां । कॄपानिधी देवराया

sharan alon tujhiyan payan | krupanidhi devaraya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शरण आलों तुझियां पायां । कॄपानिधी देवराया ॥१॥ पशु उद्धरिलें गजासी । गणिका नेली वैकुंठासी ॥२॥ ऐसा कृपेचा कोंवळा । भक्ता अधीन गोपाळा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । हीच लाधली निजखुण ॥४॥