भजनी मालिका
← भजनांकडे परत

शंख चक्र पद्म विराजत करी । बाप तो श्रीहरीं उभा वटी

shankh chakra padma virajat kari | bap to shriharin ubha vati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शंख चक्र पद्म विराजत करी । बाप तो श्रीहरीं उभा वटी ॥१॥ रुक्मिणी सत्यभामा शोबतसे राही । गरुड हनुमंत दोघे दों ठायीं ॥२॥ एका जनार्दनीं सर्वांचे सार । विठ्ठल विठ्ठल वाचें जपा निर्धार ॥३॥