भजनी मालिका
← भजनांकडे परत

शहाणे तेचि परस्त्रीपाशीं । क्षणहि सहवासीं न बैसती

shahane techi parastripashin | kshanahi sahavasin na baisati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
शहाणे तेचि परस्त्रीपाशीं । क्षणहि सहवासीं न बैसती ॥१॥ येती जाती तरी ते दुरी । चौघाभीतरी त्याचिसवें ॥२॥ तेथें कैंचा विकल्प वाढे । शूर ते गाढे निवडले ॥३॥ निळा म्हणे काळासी धाक । इतरांचा लेख काय तेथें ॥४॥