भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेल दिली मागा ऐसी । जें जें तुम्हांसी आवडे

sel dili maga aisi | jen jen tumhansi avade

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सेल दिली मागा ऐसी । जें जें तुम्हांसी आवडे ॥१॥ तरी दयाहो आपुलें नाम । अखंडित प्रेम नैसर्गिक ॥२॥ सर्वकाळ राहो चित्तीं । सगुण मूर्ति तुमची हे ॥३॥ निळा म्हणे नित्य नवी । कीर्तनीं दयावी निज आवडी ॥४॥