भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वात्मक भरला देवो । तेथें न ठेविती भावो

sarvatmak bharala devo | tethen na theviti bhavo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वात्मक भरला देवो । तेथें न ठेविती भावो ॥१॥ ऐशी भुललीं कर्मासी । आचरती तीं दोषासीं ॥२॥ सर्व ठायीं व्यापक हरी । कोण द्वेषी कोण वैरी ॥३॥ ऐसे अभागी ते हीन । भोगीताती जन्मपतन ॥४॥ नको ऐसें ब्रह्माज्ञान । एका जनार्दनीं शरण ॥५॥