भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांवरी वरिष्ठ सत्ता । वाचे गातां हरिनाम

sarvanvari varishtha satta | vache gatan harinam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वांवरी वरिष्ठ सत्ता । वाचे गातां हरिनाम ॥१॥ साधन सोपें पाहतां जगीं । सांडावी उगी तळमळ ॥२॥ रामनामें करा ध्यास । व्हा रे उदास प्रपंची ॥३॥ एका जनार्दनीं मन । करा वज्राहुनी कठीण ॥४॥