भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांचे जे मूळ सर्वांचे जें स्थळ । तें पद्ययुगलु विटेवरी

sarvanche je mul sarvanche jen sthal | ten padyayugalu vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वांचे जे मूळ सर्वांचे जें स्थळ । तें पद्ययुगलु विटेवरी ॥१॥ साजिरें साजिरें कर दोन्हीं कटीं । उभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥ नये ध्याना मना आगमाच्या खुणा । कैलासीचा राणा ध्यात जया ॥३॥ एका जनार्दनी पुरे परता दुरी । पुंडलीकांचे द्वारीं उभा विटे ॥४॥