भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । बाळपणींचा जाण सुदामा तो

sarvancha to atma kalali taya khun | balapanincha jan sudama to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । बाळपणींचा जाण सुदामा तो ॥१॥ उठोनि सत्वर धावें आलिंगना । वैकुंठीचा राणा लवलाहे ॥२॥ एका जनार्दनीं देउनी आलिंगन । आणिला संबोखून सुदामा तो ॥३॥