भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळीं एकात्मता । जोडली त्या भाग्यवंता

sarvakalin ekatmata | jodali tya bhagyavanta

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सर्वकाळीं एकात्मता । जोडली त्या भाग्यवंता ॥१॥ ज्याचा गेला अहंकार । गळोनीया मद मत्सर ॥२॥ जें जें दृष्टीपुढें देखें । तें तें हरीरुपें वोळखे ॥३॥ निळा म्हणे नित्य केला । पूर्णबोधें उदो त्याला ॥४॥