भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वगुणीं गुणमंडिता । सर्वरुपीं रुपशोभिता । सर्वी सर्व तूं अनंता । यश वागवितां निज कीर्ति

sarvagunin gunamandita | sarvarupin rupashobhita | sarvi sarva tun ananta | yash vagavitan nij kirti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सर्वगुणीं गुणमंडिता । सर्वरुपीं रुपशोभिता । सर्वी सर्व तूं अनंता । यश वागवितां निज कीर्ति ॥१॥ ऐसी असोनियां शक्ति । दवडतां कां माझी आतीं । चरण पहावया चित्तीं । वर्ते चिंता अनिवार ॥२॥ काय नाहीं तुमच्या हातीं । सकळ ब्रम्हांडाच्या व्यक्ती । घडामोडा निमिषाप्रती । धरा आवडतीं रुपें तैसीं ॥३॥ मासा कांसव डुकर होणें । नृसिंह वामन रुप ठेगणें । ब्रम्हचर्य आणि फरश धरणें । वंशनिपातनें क्षत्रियांचा ॥४॥ परमात्मा आणि राज्य करी । एकपत्नीव्रत शिळा तारी । सत्यवचनी एक बाणधरी । रावणारी मदनमूर्ति ॥५॥ नंदानंदन गुणातीत । लीलाविग्रही ऐश्वर्यनाथ । कामिनी भोगुनी कामातीत । उच्छिष्टें स्वीकारीत गौळियांचीं ॥६॥ बौध्य कलंकिया =ह्यग्रीवा । नामें रुपें नटलेति देवा । निळा म्हणे माझिया भावा । रुप भेटवा चतुर्भुज ॥७॥