भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वाघटीं बिंबला व्यापुनी राहिला । पुडलिकें उभा केला विटेवरी

sarvaghatin bimbala vyapuni rahila | pudaliken ubha kela vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वाघटीं बिंबला व्यापुनी राहिला । पुडलिकें उभा केला विटेवरी ॥१॥ सांवळा चतुर्भुज कांसे पीतांबर । वैजयंती माळ शोभे कंठीं ॥२॥ कटावरी कर पाउलें साजिरीं । उभा तो श्रीहरीं विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं बिंबे तो बिंबला । बिंब बिंबोनी ठेला देहामाजीं ॥४॥