भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वज्ञ सर्वदा तुम्ही सर्वसाक्षी । म्हणऊनि कैपक्षी हरिभक्तांचे

sarvadnya sarvada tumhi sarvasakshi | mhanauni kaipakshi haribhaktanche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सर्वज्ञ सर्वदा तुम्ही सर्वसाक्षी । म्हणऊनि कैपक्षी हरिभक्तांचे ॥१॥ खरें खोटें कळे तुम्हां वरीवरीं । संकल्प अंतरीं उठितांचि ॥२॥ जया तैसें फळ नेमुनी ठेवितां । जोडूनियां देतां काळा हातीं ॥३॥ कर्मा ऐसें फळ भोगवितां सकळ । करुनियां काळ पुढें सत्ता ॥४॥ निळा म्हणे माझें जैसें आचरण । तैसें करा दान कृपानिधी ॥५॥