भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वाभुतीं सारखा भाव । येणें माया तरे जीव

sarvabhutin sarakha bhav | yenen maya tare jiv

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वाभुतीं सारखा भाव । येणें माया तरे जीव ॥१॥ करितां अद्वैतपणें भक्ती । तेणें जीवा जीवन्मुक्ति ॥२॥ हरिनाम भजनाच्या कल्लोळ । जीव घेउनी माया पळे ॥३॥ एक करितां हरिभक्ति । एका जनार्दनीं तृप्ती ॥४॥