भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व सुखाचे जें निजसुखाचें सार गे माय

sarva sukhache jen nijasukhachen sar ge may

सर्व सुखाचे जें निजसुखाचें सार गे माय । तो हा पंढरिराया विटेवरी ।।१।। सकळ साराचें सार गे माय । तो हा पंढरिराय विटेवरी ।।२।। सर्व साधनाचें जें कां निजसाधन । गे माय तो हा पंढरिराय विटेवरी ।।३।। जे कां जीवांचे जीवन कान्होपात्राचे । निजघन ते माय तो हा पंढरीराय विटेवरी ॥४॥