भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला

sanvala dekhila nandacha | tenen anandacha pur jhala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला ॥१॥ काळीं घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥ एका जनार्दनीं सावंळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पाहतां होती ॥३॥