भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचिया समागमें । गाऊं नामें आवडी

santanchiya samagamen | gaun namen avadi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतांचिया समागमें । गाऊं नामें आवडी ॥१॥ काय आमचें करील काळ । कळीचे मळ नातळतां ॥२॥ हरीच्या नामें शुचिर्भूत । वाचा पुनीत करचरण ॥३॥ निळा म्हणे घडीं घडीं । करुं हे जोडी नीच नवी ॥४॥