भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतां ऐसा उदार एक । त्रैलोक्यनायक श्रीविठ्ठल

santan aisa udar ek | trailokyanayak shriviththal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतां ऐसा उदार एक । त्रैलोक्यनायक श्रीविठ्ठल ॥१॥ आणखी नये तुळणें दुजा । धुंडितां समाजा त्रिभुवनीं ॥२॥ ज्याचिया वचनें भवसिंधु नुरे । मायाभुररें दूरी पळे ॥३॥ निळा म्हणे सगुणवतार । तेंचि परात्पर श्रीहरीचें ॥४॥