भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतकृपावरदबळें । माझीं वचनामृतफळें

santakrupavaradabalen | majhin vachanamrutaphalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतकृपावरदबळें । माझीं वचनामृतफळें ॥१॥ स्वीकारिजे पंढरीनाथें । बैसोनियां सादर चितें ॥२॥ म्हणती गोड हे तुझी वाणी । सद्गुरुकृपेचीं बोलणीं ॥३॥ निळा म्हणे श्रोते संत । प्रसन्नपणें दत्तचित्त ॥४॥