भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचे पाय मस्तकीं । सरता झालों तिहीं लोकीं

santache pay mastakin | sarata jhalon tihin lokin

रचनाकार: संत सेना · अभंग
संताचे पाय मस्तकीं । सरता झालों तिहीं लोकीं ॥१ ॥ लोळेन चरणावरी । इच्छा फिटेल तोंवरी ॥२॥ नाहीं सेवा केली। मूर्ती डोळां म्यां देखिली ॥३॥ कृतकृत्य झाला सेना न्हावी। ठेविली पायांवरी डोई॥४॥