भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतचरणीं सावधान । ज्याचें जडलेसें मन

santacharanin savadhan | jyachen jadalesen man

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतचरणीं सावधान । ज्याचें जडलेसें मन ॥१॥ तया नाहीं जन्ममरण । मुक्तीअ उभ्या कर जोडोन ॥२॥ ब्रह्माज्ञान हात जोडी । संताघरी घाली उडी ॥३॥ शरण एक जनार्दनीं । वंदितसे अनुदिनी ॥४॥