भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतचरणीचें रजःकण । तेणें तिन्हीं देव पावन

santacharanichen rajahkan | tenen tinhin dev pavan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतचरणीचें रजःकण । तेणें तिन्हीं देव पावन ॥१॥ ऐसा महिमा ज्याची थोरी । वेद गर्जें परोपरी ॥२॥ शास्त्रें पुराणें सांगत । दरुशनें प्राणी होती मुक्त ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ठाव द्यावा संतचरणीं ॥४॥