भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचा मारग लौकीकावेगळा

santacha marag laukikavegala

रचनाकार: संत महंमद · अभंग
संताचा मारग लौकीकावेगळा । ते लाधली कळा सेख महमदा ॥ १॥ सविल वधिति गाई । म्हैसि हाले । येणे ते छेडिले काम क्रोध कल्पना ॥छ। सविल करिति सोपाटा साठिं । येणे केल्या कोटि । महापुण्याच्या ॥२॥ सविल करिति विस्वासघात । याचि वरि नेत । परउपकारि ॥३॥ सविल ते खाति मद्य मांस सरा। जाति येमपुरा येमाच्या जाचे ॥४॥ सिदि भांग भुर्का सेविति सविल । यारूचे आमोल निज नामाचा ॥ ५ ॥ सविल करिति सेत कुळवाडी । हा वाचे आवडी ॥ निरावलंब ॥६॥ सविला लागाल गुरु गोडिचा छंद । याचे वाचे हरिकथेचा ॥७॥ सविला आवडे लुडकि पोस्त । याला नित्य नित्य वीटेल चर्चा ॥८॥ सविला आवडे कुटाळि हा । भजे गोविंदा अहिर्निस ॥९॥ सेख महमद भाविकां प्रबोधा । अभाविका छउ अविद्येचा ॥१०॥ सविला आवडे धनधान्य संवति । याला सदा प्रीति साधुसंताची ॥११॥ सविल विछीती गाई म्हसियासी । विधी मुक्तीयासि कस दासि जाल्या ॥१२॥ सविले कष्टति तीर्थे व्रते सद्गुरुकृपे । सोपे वैकुंठ यासि ॥१३॥ सविला आवडे लोकांसि भांडणे । यांच्या घेतलि मने । तत्वकवि ॥१४॥ सविला आवडे अबोला धरणे । हा निवंतपणे निशब्दि बोध ॥१५॥ सविला आवडे चोरि मारि पाप । याला भाउभय परावाचेचि ॥१६॥ लोकाला (सविला) आवडे वहाड करणे ॥ सायोग्यता येणे धरीयेली ॥१७॥ योगींद्र इच्छिति नानाविध कर्म । यालागी परब्रह्म आंगे सदा ॥१८॥ अज्ञानाचि तपे ॥ अभिमानचि जे । द्वैत तेचि काजे ॥ शुभाशुभ ॥१९॥ त्रिगुण कल्पीत संविलांचे चित्त । ममत्वें विरक्त सेख महमद ॥२०॥ सविला आविडति पालख्या घोडे । छत्र्या क्षमा दया बर्‍या आवडे शांति ॥२१॥ सविल मांडति भुरासिला ॥ निजपउ याला मिरासि जाली ॥२२॥ भाटानि वर्णिल्या मुढां ॥ याला वर्णीत खरें । च्याही देव ॥२३॥ सविला मायबाप दोन्ही आवडति । याला भावभक्ति माये बाप ॥२४॥ विषयें अबळासि सविलांचे नेत्र । याचे ते पाव (?) पाहति संता ॥२५॥ सविलचि कान कुटाळि ऐकति । याचे चित्त देति कीर्तनासि ॥२६॥ सविल करि नाना सोंग तोरा । याचा वेष बरा येक वर्ष ॥२७॥ येकाचे अनेक होति केल्याबरि । म्हणउनि त्याला सरि प्रळयाचि ॥२८॥ अष्टधा प्रकृति विहावी जोडिलेव । हरिहर ब्रह्मादिकां । हा लववेना ॥२९॥ सेख महमद या नांव ठाकले । भक्तिला धरिले भाविकांचे ॥३०॥ चौसि लक्ष नावे । येके येके देही । उपनावा नाही गणीत अभक्तां ॥३१॥ सविल पीडले यानि नावे ऐसे । हायाति नामी असे ॥ आनाम आकुळि ॥३२॥ सविला आवडे मी तुं पण भूषण । कल्पनेविण मन आमन याचे ॥३३॥ आपलाल्या मते सविल फुंदति । सविल हासति रूपदर्शन न्याये ॥३४॥ सविला चटि हास्य विलास । वोजा जाणे खुणा जा ब्रह्मज्ञानि ॥३५॥ केकतिच्या झाडा कांटीयांचि । प्रबळता त्यात निवजता सुगंध केवडा ॥३६॥ तेवि अनेक दृष्टि । साधु निवजति । त्याचे गुण न धरिति नष्ट दुष्ट काटे ॥३७॥ सविल तोडिति साधु संतांचे मन । याने समाधान भलत्याचे केले ॥३८॥ नष्टा दष्टा जाये मोलेंविण वाया । कांटे करिति नास शरिराचा ॥३९॥ सेख महमद नष्टा दंष्टां बोधी । धरितिल संधी भाविक भोळे ॥४०॥ सविल पाहाति दोनि डोळियांनी । हा आनंत लोचनिं अनेक पाहे ॥४१॥ सविल विछिति लेहिले कागद हा । वाचि नंद कागद कोरे ॥४२ ॥ सविल भजति षमिक बुथिले । हा भजे परमार्थाने नाहिं वाम बुद्धि ॥४३॥ सविल पुरविति सोयेऱ्यांच्या कोड । याला बहु वेड साधुसंतांचे ॥४४॥ सविल एक देसि पुजिति देवता । हा पुजि भगता ॥ अनिवार ॥४५॥ सविल वार करि येता आता पीडिति । देव घेव करिति । पाप पुन्याचे ॥४६॥ सविल सोसिति गर्भ येमपुरि ॥ जाया गमन थोरि । जाळिली याने ॥४७॥ गरुड टके चिडीया सविलां पताका । दिंडीया तरुवर ऐक मताका यास ॥४८॥ तिवाल्या जमखाने सविला आवडति । यानि महिमा स्थिति । तिवासि थोरी ॥४९॥ सविलाचि तीर्थे पाण्याने वाहाति । या विवेक शांति सत्रावि वेणी ॥५० ॥ दगडाचे देउळे आवडति जना । याचे मना आणा ब्रह्मांड देउळे ॥५१॥ सविला आवति मंडत रखत । याला थोर शोभत मंडप नभः ॥५२ ॥ प्रतिमा देऊळे सविला आवडति । याचा देव सति । अखंड न खंडे ॥५३॥ सविला आवडति कांसिवाच्या घांटा । याचा गर्ज मोटा अनुहाते ॥५४॥ निकट निज जा सेख महमदाचि । मानली संता त्याचि प्रेमाने तत्वभळविता ॥५५॥