भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत कृपाळुं उदार । ब्रह्मादिकां न कळे पार

sant krupalun udar | brahmadikan na kale par

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत कृपाळुं उदार । ब्रह्मादिकां न कळे पार ॥१॥ काय वानूं मी पामर । थकले सहा अठरा चार ॥२॥ नेति नेति शब्दें । श्रुति विरालिये आनंदें ॥३॥ एका जनार्दनीं शरण । धरा माझी आठवण ॥४॥