भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत जाती हरिकीर्तनी । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा

sant jati harikirtani | tyanchya vahin moche vahana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत जाती हरिकीर्तनी । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा ॥१॥ हेंचि भवसिंधुचें तारुं । तेणें उतरुं पैलपारु ॥२॥ जन्मोजन्मींचे भेषज । तें हें संतचरणरज ॥३॥ संतचरणींच्या पादुका । जाहला जनार्दन एका ॥४॥