भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत आले वरले दिंडीं । हातीं खुरक्या काखेंत मुंडी

sant ale varale dindin | hatin khurakya kakhent mundi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संत आले वरले दिंडीं । हातीं खुरक्या काखेंत मुंडी ॥१॥ पंढरपुरीं पडली होड । मुटक्या परीस धांगडगोड ॥२॥ आली वैष्णवांची मांदी । मेलें डुकर बांधलें खांदी ॥३॥ एका जनार्दनीं अर्थ उलटा । तो जाणे तो गुरुचा बेटा ॥४॥