भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारीं असोनी जीनन्मुक्त भक्त । आलासे धांवत तया भेटी

sansarin asoni jinanmukta bhakta | alase dhanvat taya bheti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसारीं असोनी जीनन्मुक्त भक्त । आलासे धांवत तया भेटी ॥१॥ समाधिसुखें तल्लीन वाचे नारायण । लाविले नयन उन्मळीत ॥२॥ माथां ठेवुनी हात केला सावधान । वदे नारायण सांवत्यासी ॥३॥ येतां तुझे भेटी चोर मागें आला । लपवी मजला लवलाही ॥४॥ एका जनार्दनीं ऐकोनियां बोल । सांवत्याने सखोल दृष्टी केली ॥५॥