भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराचें सुख कोण पैं सांगती । होत फजिती लहानथोरां

sansarachen sukh kon pain sangati | hot phajiti lahanathoran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसाराचें सुख कोण पैं सांगती । होत फजिती लहानथोरां ॥१॥ सर्पें मंडुक धारिला से मुखीं । तेणें पैं शेखीं मक्षिका धरी ॥२॥ मरती बापुडी हाव धरती गोडी । तरी तीं वेंडीं नागवती ॥३॥ एका जनार्दनें न धरी सोय । वायांचि धांवो जाय हांव भरी ॥४॥