भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार पसर करिसी तळमळ । कां रे घननीळ नाठवीसी

sansar pasar karisi talamal | kan re ghananil nathavisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसार पसर करिसी तळमळ । कां रे घननीळ नाठवीसी ॥१॥ पुत्रदाराधन कवण हे कवणाचे । आहे तोंवरी माझें माझें म्हणती ॥२॥ लटिका प्रपंच सर्व नाशिवंत । एक हे शाश्वत हरिनाम ॥३॥ म्हणे जनार्दन एकनाथ घेईं । प्रमसुख पाहीं पावशील ॥४॥