भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगेन तें धरा पोटी । वायां चावटीं बोलुं नये

sangen ten dhara poti | vayan chavatin bolun naye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांगेन तें धरा पोटी । वायां चावटीं बोलुं नये ॥१॥ एक नाम वदतां वाचे । कोटी जन्माचें सार्थक ॥२॥ चुके जेणें वेरझार । करी उच्चार रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं साधन सोपें । संगतों जपें श्रीराम ॥४॥