भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगे बहु सोपया गोष्टी । करूं नेणो तो हातवटी

sange bahu sopaya goshti | karun neno to hatavati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांगे बहु सोपया गोष्टी । करूं नेणो तो हातवटी ॥१॥ ऐसें याचें नको ज्ञान । ज्ञान नोहें तें पतन ॥२॥ सांगे लोका उपदेश । आपण नेणें तो सायास ॥३॥ शरण एका जनार्दनीं । त्याची अमंगळ वाणी ॥४॥