भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडि सांडि रे गोवळ्या नाना मते

sandi sandi re govalya nana mate

रचनाकार: संत महंमद · अभंग
सांडि सांडि रे गोवळ्या नाना मते ॥ जेधे मी माजी हारपे ॥ लक्ष ते ॥१॥ आष्टधा प्रकृति तेणें जायां रे ॥ कर्ण छेदुनि भगवि मुद्रा वाया रे ॥२॥ सेवी सद्गुरु चर लवलाह्यारे ॥ तेणे सर्वहि अभ्यंतर पडे ठाया रे ॥३॥ येक म्हणति राखोना दाद भेद । जया नाहि आत्मज्ञान मुढ आंध ॥४॥ ये धरुनियां वेश मति मंद ॥ मंत्र दैवत संकल्प भव छेउ ॥५॥ सांडि भ्रांति उभ्रांति दत्तमानसि । करि चिंतन येकाग्र आहिर्णीसि ॥६॥ सेख महमद बोले स्वरूपेसि ॥ जगी अवतार घेतला मल वोसि ॥७॥ चौयासि भ्रमत जालो कासाविस ॥८॥