भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडी परापवाद खोडी । घेई विठ्ठलस्वरुपी गोडी

sandi parapavad khodi | ghei viththalasvarupi godi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांडी परापवाद खोडी । घेई विठ्ठलस्वरुपी गोडी ॥१॥ व्यर्थ टवाळाचे बोल । बोलुं नका म्हणा विठ्ठल ॥२॥ विठ्ठल विठ्ठल नेटका । भावें म्हणतां ब्रह्मा फुका ॥३॥ एका जनार्दनीं साचें । विठ्ठल विठ्ठल म्हणतां वाचे ॥४॥