भजनी मालिका
← भजनांकडे परत

संध्यावंदनीं प्रणव जपावा । वाच्य वाचकु प्रणव अवघा

sandhyavandanin pranav japava | vachya vachaku pranav avagha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संध्यावंदनीं प्रणव जपावा । वाच्य वाचकु प्रणव अवघा ॥१॥ कैसी संध्येसी साधिली संधी । देहीं हारपली देहबुद्धी ॥२॥ छंद ऋषि मंत्र उच्चार । तीं अक्षरीं झालें अक्षर ॥३॥ जपी जपमाळा मौनी । संध्या साधिली निज समाधानीं ॥४॥ सायं प्रातः माध्यान्हींक । तिहीं संधीं निःसंदेह एक ॥५॥ काळेंक काळ तीन चुळा पाणी । संध्या साधिली एका जनार्दनीं ॥६॥