भजनी मालिका
← भजनांकडे परत

सक्षत्वे जीत त्याचा होय अंत । विचारें मुरत वस्तुमाजीं

sakshatve jit tyacha hoy ant | vicharen murat vastumajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सक्षत्वे जीत त्याचा होय अंत । विचारें मुरत वस्तुमाजीं ॥१॥ पिंडीचें ते दोन्हीं ब्रह्माडींचे दोन्हीं । हे प्रळय पुराणीं बोलिलेती ॥२॥ प्रळय आत्यांतिक जेथें संहारत । विवेक आपणचि येत सर्वाठायीं ॥३॥ मग प्रचीत सहज बरवे वाईट वोज । निपजे तेथें दुजे भाव नाहीं ॥४॥ एका जनार्दनीं भला आपणचि ईश्वर झाला । तो भरुनी उरला साक्षत्वेंसी ॥५॥