भजनी मालिका
← भजनांकडे परत

सख्यत्वासी गेलों करीत सलगी

sakhyatvasi gelon karit salagi

सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणेंचि अभागी महिमा तुझा ॥१॥ पावलों आपुलें केलें लाहें रस । निदैवा परिस काय होय ॥२॥ कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापवरी तरी उपदेशीं ॥३॥ उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा म्हणे कांई बोलों आतां ॥४॥