भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकामासी स्वर्गप्राप्ती । ऐशी बोले वेदश्रुती

sakamasi svargaprapti | aishi bole vedashruti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकामासी स्वर्गप्राप्ती । ऐशी बोले वेदश्रुती ॥१॥ हाचि घेई अनुभव । सकाम निष्कम भजे देव ॥२॥ भजतां निष्काम पैं देवा । स्वर्ग मोक्ष कोणे केवा ॥३॥ एका जनार्दनीं निष्काम । वाचे वदे रामनाम ॥४॥