भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ मंत्रांमाजी मंत्र उत्तम । दोंनीं अक्षरें जगतां राम । निरसोनियां मायादि भ्रम । पाविजे निजधाम अनायसें

sakal mantrammaji mantra uttam | donnin aksharen jagatan ram | nirasoniyan mayadi bhram | pavije nijadham anayasen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सकळ मंत्रांमाजी मंत्र उत्तम । दोंनीं अक्षरें जगतां राम । निरसोनियां मायादि भ्रम । पाविजे निजधाम अनायसें ॥१॥ तैसाचि मंत्राराज प्रसिध्द । त्रि अक्षरीं जपतां गोविंद । नरनारी बाळकें शुध्द । पावती अच्युतपदातें ॥२॥ चतुराक्षरीं मंत्र सरळ । जपतां नारायण श्रीगोपाळ । चतुर्भज होती सकळ । स्वरुपता पावतीं ॥३॥ त्रि अक्षरीं मंत्रसार । विठ्ठल नामाचा उच्चार । निळा म्हणे करितां नर । न ये समोर कळीकाळ त्या ॥४॥