भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ देवांचा जनिता । त्रिगुण सत्ता चाळविता

sakal devancha janita | trigun satta chalavita

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ देवांचा जनिता । त्रिगुण सत्ता चाळविता ॥१॥ शरण जाता ज्याच्या पायां । सर्व हारपली माया ॥२॥ भेदाभेद निवारिले । सर्व स्वरुप कोंदलें ॥३॥ एका जनार्दनीं शिवें । जीवपणा मुकलों जीवें ॥४॥