भजनी मालिका
← भजनांकडे परत

सका साधनांचें सार । मुखी नामाचा उच्चार

saka sadhananchen sar | mukhi namacha uchchar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सका साधनांचें सार । मुखी नामाचा उच्चार ॥१॥ सकळ तपांचे जें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥२॥ सकळ ज्ञानाचें जें सार । मुखी नामाचा उच्चार ॥३॥ सकळ ब्रह्मा विद्येंचें जे घर । एका जनार्दनींचें माहेर ॥४॥