भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण रूपडें अद्वैत बुंथी । घेऊनि पंढरपुरी उभा विटे

sagun rupaden advait bunthi | gheuni pandharapuri ubha vite

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सगुण रूपडें अद्वैत बुंथी । घेऊनि पंढरपुरी उभा विटे ॥१॥ डोळियांची धणी पहातां न पुरे । मनचि चांचरे पाहतां पाहतां ॥२॥ रुप आकारलें पुंडलिकाचे भेटी । उभे असे तटी भीवरेच्या ॥३॥ एका जनार्दनीं उपाधी निराळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥