भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहतां नित्रीं न भासे सादृश्य । देखतां देखत होतो अदृश्य

sagun nirgun nohe vruksha | pahatan nitrin na bhase sadrushya | dekhatan dekhat hoto adrushya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहतां नित्रीं न भासे सादृश्य । देखतां देखत होतो अदृश्य ॥१॥ सांग रे कान्होबा हें कोंडे । तुझें तुजपाशीं केलें उघडें । आम्हां न कळे वाडेंकोडें ॥२॥ एक मुळीं वृक्ष देखिला । द्विशाखां तो शोभला । पाहतां पत्र पुष्पें न देखिला ॥३॥ ऐसें वृक्ष अपरंपार । एकाजनार्दनीं करा विचार । मग चुकेल वेरझार ॥४॥